Ad will apear here
Next
भारती विद्यापीठ आणि ‘सेस न्यूफिल्ड’मध्ये सहकार्य करार
पुणे : भारती विद्यापीठ आणि सेस न्यूफिल्ड-फ्लेम युनिव्हर्सिटी यांच्यात संशोधन उपक्रमांसाठी सहकार्य करार करण्यात आला असून, त्यानुसार या दोन्ही विद्यापीठांत संशोधन उपक्रमांमध्ये आता एकत्रित काम केले जाणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटचे (आयएमइडी) संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सहकार्य करार झाला. या करारानुसार ‘सेल्स ट्रान्सफॉर्मेशन अँड कस्टमर एंगेजमेंट’ विषयावर पहिला मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चार डिसेंबर २०१८रोजी फ्लेम युनिव्हर्सिटी (लवळे) येथे आयोजित केला होता.

‘सेस न्यूफिल्ड’चे संचालक डॉ. शेरॉन बर्नहार्ड आणि सेस न्यूफिल्ड-फ्लेम युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. पवन मामिदी यांनी या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये मार्गदर्शन केले. यात ‘आयएमईडी’चे सर्व प्राध्यापक सहभागी झाले होते. डॉ. सौम्या संपत यांनी स्वागत केले. सोनाली खुर्जेकर यांनी आभार मानले.

(Please click here to read this news in English.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUXBV
Similar Posts
‘आयएमईडी’मध्ये ‘मुंबईचा डबेवाला’ विषयावर व्याख्यान पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) ‘मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला’ या विषयावरील व्यवस्थापनशास्त्र व्याख्यानास प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळाला. व्यवस्थापनशास्त्र व्याख्याते डॉ. पवन अगरवाल यांनी मुंबई डबेवाल्यांच्या अचूक सेवा आणि यशाचे रहस्य सांगितले
‘आयएमईडी’च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखांपर्यंतची प्लेसमेंट ऑफर पुणे : ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमधील (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या (एमबीए) विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक सात ते ५४ लाखापर्यंतच्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. १७१हून अधिक
‘रस्ता सुरक्षा’विषयी शुभेच्छापत्रांचे वाटप पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी) च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभाग (एनएसएस) यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती, स्वच्छ भारत आणि ग्रीन इंडिया अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानातंर्गत शहरातील विविध भागातील प्रमुख २० सिग्नलच्या ठिकाणी
‘आयएमईडी’च्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) आयोजित करण्यात आलेल्या एमबीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language